भारतीय संस्कृती
भारतीय संस्कृती
आवडते मला भारतीय संस्कृती
त्यात नाही विदेशी वळण विकृती
व्यास वाल्मिकी सारखे
महाकवी लाभले भारतास
हेच तर रहस्य आहे
भारतीय संस्कृतीचे खास
विवेकानंद रामकृष्ण
आहेत भारताचे आदर्श पुरुष
त्यांच्या वास्तव्याने
पवन झाली भारत भूमी
कर्ण अर्जुना सारखे वीर
धरुनी धनुष्याला तीर
अमर इतिहास घडविती
आज उरल्या अमर स्मृती
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,
संत रामदास, संत एकनाथ
संत मीराबाई , संत बहिणाबाई
अनेक संताच्या शिकवणीत
घडली भारतीय संस्कृती
महाराणा प्रताप,
छत्रपती शिवाजी महाराज
स्वराज्य संस्थापक अनमोल रत्ने
जगावर उधळणारी भारतीय संस्कृती
भारत पाक युद्ध समयी
अनेक वीर देती प्राण
ते पाहून फुलून येते देशभक्ती
आणि आभिमनाने फुलते छाती
अशी आहे भारतीय संस्कृती
कन्याकुमारी तील पाण्याची लाट
आदळते गौरीशंकर यांच्या पायावर
प्राणा चीही लावून बाजी
मातृभूमीचे रक्षण करण्याची
विलक्षण शक्ती म्हणजेच
भारतीय संस्कृती
या अस्मितेला म्हणावे
भारतीय संस्कृती
पडता कुणाची वक्र दृष्टी
कट कारस्थाने रचली जाती
या जाणिवेने रक्त सळसळे जवानांचे
हेच लक्षण भारतीय संस्कृतीचे
सिंधू पासून गंगे पर्यंत
कुरुक्षेत्र ते पानिपत पर्यंत
रायगडा पासून जालियनवाला बाग
धाडसी असा इतिहास घडला
ती हीच आहे भारतीय संस्कृती
जवान पुत्र देशाच्या सीमेवर
पाठवणारी आदर्श माता आदर्श पिता
रक्त तयांचे ते सांडले सीमेवर
आणि झाले सुपुत्र अजरामर
त्याग समर्पण असते
भारतीय संस्कृतीत
तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे
हिरोजी इंदुलकर, जीव महाला
मावळ्यांची आणि पराक्रमाची
आठवण घडविते भारतीय संस्कृती
यांच्या कार्यामुळे येते
स्वराज्याची प्रचिती
भारतीय संस्कृतीत आहे
साधे वस्त्र परिधान वृत्ती
बोले तैसा चाले ही
शिकवण देते भारतीय संस्कृती
भारत देशात चार वेद
ऋग्वेद , यजुर्वेद,
सामवेद, अथर्ववेद
मनुस्मृती, उपनिषदे
वांगमय निर्मिती
भारतीय संस्कृती
हिंदू धर्म आहे श्रेष्ठ
अतिथी देवो भव ही
संकल्पना राबवायला
घेतात सर्व मनातून हसत मुख कष्ट
उगवले ते नाशवंत
जन्म मरण अनिवार्य
आहे या धरतीवर
अनेक थोर शास्त्रज्ञांचा
जन्म झाला आहे भारतात
साता समुद्रापार त्यानी
राबविला नाना शोध प्रताप
साने गुरुजी, वी. स.खांडेकर
व . पू. काळे, कुसुम अग्रज
असे अनेक लेखक कवी
याच्या प्रगल्भ ज्ञान चे भांडार
आहे आपल्या भारतात
अनेक किल्ल्याचा आहे समावेश
आणि रक्तात वेगळाच येतोआवेष
