रिकामा देव्हारा
रिकामा देव्हारा
देवघर घेताना घडला भन्नाट किस्सा
रंगवून सांगते मी जसास तस्सा
पाहता क्षणभर मन गेले हरपून
देव्हारा पाही मी सदा निरखून
देव्हाऱ्या ची होती मज हौस भारी
माझी निवड सर्वात आहे हो न्यारी
देव्हारा जोपर्यंत नव्हता घरात
लक्ष्मी रुसून येत नव्हती दारात
होता एक सुंदर देव्हारा घ्यायचं मनी
पण काय करू ऐकतच नव्हते धनी
असेच थोडे थोडे केले पैसे मी जमा
झाले देव्हारा घेण्या पुरते पैसे जमा
मग मनी ना उरली हो कशाची तमा
गेले बाहेर घ्यायला देवघर चमचम
वास यायला हवा चंदन घम घम
खर्च झाले सर्व निधी तरी नाही तमा
अशीच गेले मी हो बाहेर घ्यायला
लेकरं म्हणाले
अग आई घ्यायचं देवघर कशाला
उगीचच पैसे होतील ग खर्च
देवघर आहे ना सध्या चौरांगाच
मग मला मात्र आल रडायला
कोणीच तयार होई ना देवघर घ्यायला
गेले पैसे घेवून बाजारात अशीच
बरेच देवघर पाहिले की हो तशीच
मग एका दुकानात बरीच होती सुंदर
सुंदर देवघरात होते बारीक नक्षीकाम
आवडले देवघर त्यावरील नक्षीकाम
होते शुभ लाभ
त्यावर नाव कोरलेले
हत्ती होते देवघरात
पायथ्याल ठेवलेले
आनंद माझा मावेना गगनात
पाहून सुंदर सुंदर आकर्षक देवघर
देवघर पाहून हर्ष झाला मनी
आनंदाने पाणी येऊ लागले नयनी
अनेक वर्षांची प्रतीक्षा
होणार होती समाप्त
अनेक वर्षांची मनातील इच्छा
होणार पूर्ण आज हीच सदिच्छा
घेतले मी निवडून देवघर सागवानी
त्याला पायरी मात्र बसवली चंदनी
आणले देवघर मी आनंदात घरी
रागावले धनी छडता घराची पायरी
सगळा आनंद मावळला क्षणात
गेले देवघर घेवून मी हो घरात
घरात जाताच म्हणाले मला धनी
वेडी आहे का ग तू माझे सजनी
मी पैक्या पायी वणवण करतोय
रात्र दीन मी शेतात खूप राबतोय
अनवाणी मी सारखा फिरतोय
अन् तू अशी का वेड्यवणी करतेस
लेकरांचा तोंडचा घास हिरावून
देवघर घेण्यासाठी पैका खर्च करतेस
माझ्या आंनदावर विरजण पडले
घरात जावून मी ओक्सा बोक्सी रडले
सकाळ झाली मी आंघोळ केली
देवपुजेला बागेतून फुले मी नेली
देवघर आतून बाहेरून
केले मी मन लावून स्वच्छ
देवघरातील देवांना घातले
मी पंचामृताने पवित्र स्नान
त्यांचे कपड्याने केले कोरडे अंग
नंतर त्यांना घातले जरीचे वस्त्र
जरीचे वस्त्रांचे रंग खूप विविध
पाहून त्यांना मन होते हर्षित
कुमकुम तिलक लावला गंध
फुले वाहिली मनोभावे देवाला
अगरबत्ती , धूप, लावली देवाला
दिवा लावून केली प्रार्थना या क्षणाला
मन माझे झाले खूप खूप प्रसन्न
पुजले देवाला भावपूर्ण
नैवद्य दाखविला देवाला
पाणी ठेवले कलशात
कालच्या घडलेल्या प्रसंगाचे
झाले मला पूर्ण विस्मरण
सर्व मळभ झाले दूर
कुविचार गेले पळून भू र
असे रामायण महाभारत गेले घडून
मी तर विचारात गेले
गढून
