लता दीदी पोवाडा
लता दीदी पोवाडा
28 सप्टेंबर 1929
या शुभदिनाला
मंगेशकर यांच्या घराण्याला
प्रतिभावंत कन्यारत्न ने जन्म घेतला
गायन कलेचा जन्मजात वारसा
बालपणी त्यांना हो लाभला
विश्वविख्यात सुप्रसिद्ध मास्टर
दीनानाथ मंगेशकर लता दीदी
यांचे प्रथम गुरू जाहले.
कुसुम , देसकराच्या पद गायनाला
संगीत पदाला , त्यांच्या बोल पटाला
बहुसंख्य टाळ्या त्यांना लाभल्या
नवयुग , प्रफुल्ल संगीत भूमिका
पण उत्कृष्ट रित्या हो केल्या
त्यांच्या अभिजात या गुणांनी
जनतेने गौरव हो केला
गुरू दीनानाथ मंगेशकर यांच्यासह
खासाहेब अमानाली खा, देवासच्य
रजबअली घराण्याचे अमानत खा
यांचे शास्त्रीय संगीत कलेचे ,
यथेच्छ मार्गदर्शन हो लाभले
36 विविध भाषांतील गाणी
त्यांनी उत्कृष्ट रित्या गायिली
50हजार गाणी
अविरत हो गायिली
अती मधुर हृदय स्पर्शी होती गाणी
ऐकता सर्वांचे मन भावना हो जागृत सर्वांच्या डोळा येत असे पाणी
जगातील जास्तीत जास्त गाणी
स्व आवाजात ध्वनी मुद्रित हो केली
सुवर्ण ध्वनी मुद्रिका पुरस्कार हो मिळाला
त्यांच्या या महान अविरत कार्याची
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये
लता दीदींच्या नावाची नोंद हो झाली
राष्ट्रीय पुरस्कार भारत रत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण त्यांना गौरवाने हो मिळाले.
आस्था न विद्ववान, स्वर भारती,
स्वर लता, स्वर श्री , कला प्रवीण,
डी.लीट . भारताची गानकोकिळा
नाना पदव्या त्यांना हो मिळाल्या.
सूर सिंगार आणि तानसेन व रसेस्वर
अनंत पारितोषिके लता दीदींना हो मिळाली
प्रतिभावंत व्यक्ती 1000वर्षानंतर
जन्माला हो आली
त्यांच्या गायन कलेची कीर्ती
सर्व जगात हो पसरली
जसा चंद्र सूर्य पृथ्वीवर आहे
तसा त्रिकाल बाधित अमर स्वर
लता दीदी यांचा अमर राही
बालपणी त्यांना एक स्वप्न सतत पडे
मंदिर पायरीवर लता दीदी बसलेल्या असत गडे
त्यांच्या पायाला सागराचे पाणी स्पर्शून हो मागे फिरे
माई ला अर्थ स्वप्नाचा विचारता
माई म्हणत तुझी कीर्ती साता समुद्रा पार हो पसरणार
धन्य धन्य आपला भारत देश महान
लता दीदी एक अनमोल रत्न नव्हते लहान
लता दीदी आपणास लाभल्या
त्यांनी ज्ञानेश्वरांच्या ओव्या, गीता
भावपूर्ण हो गायल्या
लता दीदी होत्या संगीतकार
आनंदघन नाव केले अंगीकार
जयप्रभा स्टुडिओ संचालिका
सुरेलचीत्रा संस्था निर्मात्या
सर्व जगाला हो कळल्या
लता दीदींच्या सन्मान पुरस्कार
यांना देखील अभिमान भूषण वाटे
कारण की सन्मान पुरस्कार यांना
लता दीदी भेटल्या
06/02/2022
एक काळा दिवस हो उगवला
सर्वांना आवडणारा सुर निखळला
भारत देश शोकाकुल हो झाला
भारत सरकारने या अमर रत्नासाठी
07/02/2022 ही तारीख
सार्वजनिक सुट्टी जाहीर हो केली
शोक सागरात अख्खं जग हो बुडाले
क्वीन ऑफ मेलोडी अनंतात विलीन हो झाली
