कविता
कविता
जेवलो गोडजेवण आत्ताच ज्याचे
कळाले तो उपासमारीने मेला होता
मरण्याचा बाजार तेजीत आहे सध्या
का यासाठी तो फासावर गेला होता?
हवामाणाप्रमाणे नुसतेच अंदाज होते
मी जगण्याचा प्रश्न संसदेत नेला होता
तक्रार घेऊनी गेलो कित्तेकदा मंत्रालयी
नंतर कळले साहेब त्यांचाच चेला होता
भाकरीही आज गेली अंधारात त्यांची
जगण्याचा ज्यांनी कधी उठाव केला होता
ते भांडत राहीले रंगावरुनी रात्रभर सभेत
मी तिथे फ़क्त माणसांचा झेंडा नेला होता
