STORYMIRROR

yuvaraj jagtap

Tragedy

3  

yuvaraj jagtap

Tragedy

कर्म कहाणी

कर्म कहाणी

1 min
14.4K


काय म्हणावे तुम्हा आता, कशी जन्माची कहाणी

दूर लोटले आयुष्य सारे, अंत आहे बाकी      ।।धृ।।


सोसूनिया यातना,दिला जन्म तुम्हा आम्ही

दाविली चौफेर फिरुनी, दुनिया सारी तुम्हा

लाविले तुम्ही, वृद्धाश्रमाच्या दारी आम्हा   ।।१।।


पिकल्या पानांना, आधार म्हणुनी आम्ही

हात धरुनी शिकवले, चालण्या तुम्हा

उतरतीच्या वाटेवर, शिव्यांचा डागण्या दिल्या आम्हा ।।२।।


खाऊनी माती, जाळूनी रक्त आम्ही

जगविले मायेने, वाढविले तुम्हा

दोन वेळच्या अन्नासाठी, धाडले दुसऱ्या दारी आम्हा।।३।।


गाळुनी घाम, रक्ताचे करुनी पाणी आम्ही

पोसले, शिकविले आम्ही तुम्हा

आयुष्याच्या तिरावर, अनवाणी फिरविले आम्हा ।।४।।




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy