पाऊस
पाऊस
पावसा का तू असा रडवतो
धरणीचा 'बा' इथे वाट बघतो,
यंदा खट्याळ बरसून पिकू दे
फक्त इतकेच मागणे मागतो.
पावसा ये ना रे लवकर
रुसवे फुगवे विसरून,
शेतकरी बाप बसलाय
कपाळावर हात ठेवून.
पीक नाही, पाणी नाही
शेतकरी 'बा' पडलाय मरून,
आता तरी ये राजरोस
पाऊस कुठे बसलाय दडून.