STORYMIRROR

Vanita Shinde

Tragedy

3  

Vanita Shinde

Tragedy

स्त्री वेदना

स्त्री वेदना

1 min
14.7K


गर्भात असल्यापासूनच

करावा लागतो संघर्ष स्त्रीला,

अहवेलनेच्या वेदना सोसत

झगडावं लागतं सदा तिला.


माता,भगिनी,सखी नि पत्नी

रुपे अनेक साकाराते ती

कधी प्रेमळ तर कधी कठोर

स्वभावाचे तिच्या रंग किती.


जीवनात इथे क्षणोक्षणी

जपायची तिनेच सर्व नाती,

बुरसट संस्कृतीच्या नावाखाली

होते तिच्या इच्छांची माती.


चारित्र्याचे रक्षण करताना

लागे टांगणीला तिचा जीव,

कुटंब आपले सावरताना

कर्तृत्वाची ती ठेवते जाणीव.


मनीच्या स्वप्नांचा देत बळी

करते घराच्या सुखाचा विचार,

स्वाभिमानाने जगण्यासाठी

नाही बनत ती कधी लाचार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy