STORYMIRROR

Ujwala Wadnere

Tragedy

3  

Ujwala Wadnere

Tragedy

आसं

आसं

1 min
160

औंदा नाही आला पाऊस 

दगा देऊन गेला मला पाऊस..


 सुकले शिवारं सुकली धरा झाली उदास

 सुकलेल्या अंगाला पडल्या तडा नाही आला पाऊस 


कसे फेडू कर्ज सावकारच तुझ्या भरोशावर घेतलं

बळीराजा टकमक पाहे नभाकडं रडे लावुन मनीआस

नाही आला पाऊस 


न मिळे अन्नधान्य गोरगरिबांला कसं पोट भरु अनोसं

उपाशी मरतील लेकरबाळं पोटाला मारली तू कास.. 

नाही आला पाऊस


नभ दिसे अवचित काळेभोर जीवाला लावी तु आस

करीन पेरणी साठवण पाणी भाताला न दिसे टिपूसं

नाही आला पाऊसं


माणसे, जनावरे अन्नपाणी वाचुन मृत पावली निष्पाप 

विहीर कोरडी पडली नदी नाले आटली येईना पाऊस

नाही आला पाऊस


नको पाहू अंत पावसा विनवी बळी होवून कासावीस..

 वाट पाहुन त्यानं जीव सोडला सोडली पावसाची आसं

 नाही आला पाऊसं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Ujwala Wadnere

Similar marathi poem from Tragedy