STORYMIRROR

Ujwala Wadnere

Others

3  

Ujwala Wadnere

Others

मनोमिलन

मनोमिलन

1 min
228

 पावसा तु मला भेटावे. 

बस मी तुला पहावे.

 पहाताच रहावे... 

स्मितहास्यात हास्यकल्लोळ 

दोघात व्हावे,

नभ गर्जावे.

हिरवाईने आनंदात डोलावे,

मोर मयुर पायातील घुंगरूच्या

तालावर तयांनी रानात नाचावे.

राघू मैनेने चिंब श्रावणा..

तुझ्यात न्हावे, जांबावर चोची मारत झुले झुलावे.

पारीजातकांच्या शुभ्रफुलाच्या झर्यात प्रभातीला,

रिमझिम पावसा तुला पहावे.

मोगर्याच्या सुंगधात तु

दरवळुन जावे माझ्यात,

मीच मुग्धपणे लाजावे तुझ्यातं

पावसा तु मला भेटावे.

पानाफुलाचीं रंगीबेरंगी 

ओढणी ओढुन मी लपावे, 

मुखडा झाकून तुला पहावे. 

हळुवार झुळकेसवे तु पण यावे

सावरावी ओढणी तु माझी, 

 हिरवीगार शाल पांघरुण 

 तुझ्यात पावसा भिजावे

मी तुझ्यात भिजावे, बस मी तुला पहावे 

पावसा तु मला भेटावे. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Ujwala Wadnere