STORYMIRROR

Vimal Patkari

Tragedy

3  

Vimal Patkari

Tragedy

दृष्ट लागण्या जोगा....

दृष्ट लागण्या जोगा....

1 min
270

दृष्ट लागण्याजोगा संसार सारा....

जसा स्वर्गिचा साज

जसे इंद्राचे राज

रथी सारथीची साथ

सागरा भरतीचा साज

जीवनी संगित साथ

सदा प्रफुल्लीत बाग

नंदनवनिचा सुवासिक 

बहरता गुलाब !!

जसे निर्मळ जीवन 

संसारी झळके रविकिरण 

रेखा सुखवी जीवन 

संसाराचे भूषण 

साजे प्रेमळ साजन

सुखी समाधानी मन 

जणू पुनवेचा स्वच्छंदी 

सुमधुर प्रकाश !!

प्राक्तनी लुटला साज

चक्राचा मोडला आस

साथीची सुटली साथ

मनी कोमेजली बाग

वाटे सारे उदास

तरी चालते ही वाट

मधुर आठवणिंची मनी 

घेवुनिया साथ !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy