STORYMIRROR

Vimal Patkari

Classics Inspirational

3  

Vimal Patkari

Classics Inspirational

आवाज ' स्री ' अंकुराचा !!

आवाज ' स्री ' अंकुराचा !!

1 min
5

तुम्हा साद घालिते आई-बाबा 

येवू द्या मला या सुंदर जगात 

पाहू द्या मला या सुंदर जगास !!

खूप खूप शिकून विद्याविभुषीत होणार

सर्वोच्च पदी विराजमान मी होणार

शौर्य,धैर्य गुण हिरकणीचा घेणार

अस्मिता माझी ही मी अबाधीत ठेवणार !! 

भीती तुम्हा माझी का हो वाटतेय बाबा ?

हुंडाबळी,अत्त्याचाराला घाबरु नका 

अत्त्याचार्याला दुष्कृत्त्याची अद्दल घडवण्या

हिमतीनं,चातुर्यानं वल्हवीन जीवन नौका !!


दादाचाच हट्ट काहो करताय बाबा

मी ही कमी नाही कर्तुत्वात बघा

म्हातारपणी तुमचा करुनी सांभाळ 

साकारीन मी ही वंशदिव्याचं काम !!

नारीशक्ती,माया,ममता,विनम्रता

स्वावलंबन,स्वाभिमान,सुसंस्कृतता

स्वराज्य,स्वदेशाभिमान राखण्या सदा

जिजाऊ होवून मी जन्मा येणार !!

सारा भारत हा साक्षर करण्या 

निरक्षरांना शिकवण्याचा घेईन वसा 

साक्षरता अभियान पुर्णत्वास नेण्या

शिक्षणकार्य सतत करण्या सावित्रीमाई मी होणार !!


भारतमातेचं रक्षण करण्या

कर्तव्यदक्षतेनं सदा सज्ज राहण्या

तळहाती शीर घेवून शत्रुशी झुंजण्या 

मर्दानी झाशिची राणी मी होणार !!

सुजलाम-सुफलाम असा हा देश आपला

धन-धान्याने समृद्ध राहण्या सदा 

शेती तंत्रज्ञानाचं मी शिक्षण घेणार

शेतकरी राजाची ही राणी मी होणार !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics