'शारदा ' स्त्री शिक्षणाची
'शारदा ' स्त्री शिक्षणाची
क्रांती करूनी स्री-शिक्षणाची सरस्वती झाली
तिलांजली सर्वस्वा देऊनी झाली महन्माऊली!!
ज्योत अक्षरांची करण्या प्रज्वलीत क्रांतीज्योत झाली
तिमीर अज्ञानाचा दूर सारण्या दीपस्तंभ झाली!!
साऱ्या भगिनींना साक्षर करण्या शारदा तू झाली
विकसीत करण्या अक्षरबाग जीवनसरिता झाली!!
त्री-कौल ज्ञान-मान-धैर्याचा देण्या कुलस्वामिनी झाली
बाराखडी ,मुळाक्षरे शिकवण्या झाली गुरुमाऊली!!
ईमारती शिल्प उच्च घडवण्या स्री शिल्पकार झाली
फुलवण्या सदैव स्री जन्माचा श्वास तूच झाली!!
लेखणी देण्या स्रीच्या हाती तू पर्वणीच झाली
सदैव आमुचा लाख प्रणाम तव पवित्र चरणासी!!
