वात्सल्यसिंधू आई !!
वात्सल्यसिंधू आई !!
वात्सल्यसिंधू आई माझी तू
दया,माया,ममतेचा सागर ही तू !!
गर्भातच संस्कार करूनी
प्रेमानं हितगुज करुनी
डोहाळे सारे तुझे पुरवुनी
आवड निवड माझी सारी जपुनी
असह्य प्रसुती वेदना साहुनी
जन्म दिला मला तू माऊली !!
कर्तव्यदक्षतेने तुझिया आई
उच्चपदी विराजमान झाले मी
सुसंस्कारांनी तुझ्या गं आई
दोन्ही कुळांची माझ्या शान वाढली
धन्य धन्य तू माय माऊली
माझ्या जीवाची तू गं साऊली !!
झाले बघ आता मी ही आई
माझ्या बाळाला जन्म देवुनी
तुझ्यासम माया ममता ही सारी
आली गं आई माझ्याही हृदयी
चिमण्या पाखराला या माझ्याही
वाढवीन मी ही जिवापाड जपुनी !!
झाले जरी आई मी गं मोठी
माया मूर्त तुझीच मी पाही
तुझी माया,ममता गं न्यारी
ना मिळे कधी कुठल्याही बाजारी
कसली ही उणीव नसली तरी
आई तुझ्याविना गं मी भिकारी !!
जीवनाची मम करुण कहाणी
कुणी पुसे ना तुज वाचुनी
येशील परतून कधी गं आई ?
सांग ना हळूच तू माझ्या कानी
तुझिया कुशीत सामावण्याची
आस पुरवाया पुन्हा तू ये ना आई
आई माझी !
