STORYMIRROR

Vimal Patkari

Romance Fantasy

3  

Vimal Patkari

Romance Fantasy

रंगांच्या भावविश्वात रंगुया !!

रंगांच्या भावविश्वात रंगुया !!

1 min
12

खेळू या रंगहोळी आज सजनी

उधळुनी रंगाची रास

राग,रुसवा सारा तू सोडूनी ये ना

प्रीतीच्या रंगात सखे रंगू या ना !!

लाल रंगाची प्रीत लाली

लावू दे ना सखे तुझ्या गाली

तुझी माझी प्रीत कहाणी

येवू दे ना सखे गं बहरुनी

शांती नील रंगी तू घेवून ये ना

प्रीतीच्या रंगात सखे रंगू या ना !!

मातृनिसर्गाच्या विविध पैलूंचा

गरतीच्या लेण्याचा हा हरित रंग 

सुखसमृद्धीचं प्रतीक असुनी

खुलवी हा सारी सृष्टी लईभारी

ऋतू वसंताच्या स्वागताला 

आनंदानं रंग पिवळा उधळू या ना !!

प्रीत रंग हा सखे गुलाबी

तुला अन मला हळूच खुणवी

चंचलता,कोमलता,प्रीत तुझी

माझ्या मना साद घाली

सखे तुझा माझा स्नेहबंध हा

प्रीत रंगात खास या रंगवू या ना !!

ऊर्जा,उत्साहाचं प्रतीक रंग नारिंगी

राज विलास भाव जांभळा रंग दाखवी

शांती,शुद्धता,पवित्रताही रंग पांढरा पहा शिकवी घेवून याचा संग सखे होवू दंग स्वच्छ,नितळशा प्रीत रंगी रंगू या ना !!

निर्भरता दिसे भुऱ्या रंगात

शक्ती,लालित्य असे काळ्या रंगात

प्रेम,सुख,स्वस्थता लाभण्या जीवनात 

शक्ती काळ्या रंगाची ठेवू या ध्यानात

भाव जाणुनी या रंगांचे साऱ्या 

सखे लईभारी रंगात रंगू या ना !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance