STORYMIRROR

Vimal Patkari

Action Inspirational

3  

Vimal Patkari

Action Inspirational

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
192

थोर महात्मे अन संतांचा

शूर पराक्रमी राजांचा

मर्द मराठा मावळ्यांचा

शौर्य अन त्यागाची गाथा 

इतिहास महाराष्ट्र माझा !! 

शिखरे अन डोंगर दऱ्या 

पर्वत कडा अन रांगा

कोरीव लेणी वेरुळ अजिंठा

आणिक साऱ्या गडकिल्ल्यांचा

निसर्गरम्य महाराष्ट्र माझा !!

सर्वधर्म समभाव शिवबांचा

राव अन रंक साऱ्यांचा

शेतकऱ्यांचा,कष्टकऱ्यांचा

सीमा सुरक्षा सैनिकांचा 

अभिमान महाराष्ट्र माझा !!

शूर वीर अन विरांगणांचा

थोर समाज सुधारकांचा

जिजाऊ अन हिरकणीचा

झाशिच्या रणरागिणीचा

स्री सरस्वती सावित्रीचा

उत्तुंग महाराष्ट्र माझा !!

वेष नउवारी लुगड्याचा 

डोईवर पदर शालीनतेचा

कपाळी तिलक कुंकवाचा

मराठमोळ्या अस्मितेचा

सुशील महाराष्ट्र माझा !!

साऱ्या सण अन उत्सवांचा

रुढी आणिक परंपरांचा

थोरांच्या मान सन्मानाचा

' अतिथी देवो भव ' मंत्राचा

सुसंस्कृत महाराष्ट्र माझा !!

अभंग अन भारूडाचा 

लावणी अन पोवाड्याचा

शेतकरी अन कोळी गीताचा

विविध भाषेतील लोकगीतांचा

राष्ट्रभक्तीपर स्फूर्तीगीतांचा

नादमधूर महाराष्ट्र माझा !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action