भारत भू ची बालकं !!
भारत भू ची बालकं !!
सर्व बालकं :- आम्ही बालकं बालकं
भारतभूची बालकं
करण्या रक्षण
सज्ज आम्ही रक्षक !!
या पवित्र धरणीवर
आहे नररत्नांची खाण
रुढी परंपरा संस्कृती
आहेत लई लई छान
स्मरुनी साऱ्यांना
घेवू एकात्मतेची आण !!
शेतकरी:- बळिराजा होवुनिया
सेवा धरणीची करणार
घाम मातीत गळुनिया
राबराब राबणार
पिकवुनी सोनपीक
देश समृध्द करणार !!
सैनिक:- सुरक्षा जवान होवुनिया
दिनरात सज्ज राहणार
शत्रुशी झुंजुनिया
मायभुमिला जपणार
लढू हाती घेवून शीर
नाही देणार काश्मीर !!
भारतमाता:- बळीराजा अन जवान
तुम्ही दोघंही महान
मी तुम्हा मुळेच पाहते
जीवनाची रोज पहाट
कष्टानं इमानानं
जपा ही मानवता महान !!
