छान, सुंदर, महान भारत !!
छान, सुंदर, महान भारत !!
साऱ्या जगात देश आपला आहे बहू महान
सारे जहां से अच्छा आपला भारत सुंदर छान !!
विंध्य हिमाचल यमुना गंगा
कोरीव लेणी वेरुळ अजिंठा
कुतुबमिनार अन ताजमहाल
द्वारका काशी अन रामेश्वर
काश्मिर केरळ निसर्गरम्य !!
यारे सारे या रे सारे
एकच होवू यारे
एक होवुनी आपण
आपला काश्मिर वाचवू यारे
हिंदू,मुस्लिम,सीख,इसाई
आपण सारे भाई भाई
भारतमाता आपली आई !!
पंजाबी आम्ही,सिंधी आम्ही,गुजराथी आम्ही
महाराष्ट्रीय आम्ही,बंगाली आम्ही, तामिळी आम्ही
वेगवेगळी वेषभुषा ही
वेगवेगळी भाषा आमुची
वेगवेगळा धर्मपंथ तरी
भारतभुशी आमुची नाती
सार्यांच्या देहातील रक्ताचा
रंग असे हा एक
सार्या धर्माहूनही श्रेष्ठ
मानवधर्म हा एक
समता,बंधुता आणि एकता
म.फुलेंची शिकवण ध्यानी ठेवता
भेदभाव सारा विसरुनी रुजवू
मनोमनी राष्ट्रीय एकता !!
शेतकर्यांचा,कष्टकर्यांचा,
सीमा सुरक्षा सैनिकांचा
पवित्र उज्वल परंपरेची
खाण असे हा महान भारत
पवित्र ऐशा भुमीवरती
आतंकवादी का आतंक करिती
मंदिरात का आतंक करुनी ?
निर्घूण ऐशी हत्त्या करिती
सापडले जरी तावडीत
आमच्या आतंकवादी
सोडणार ना त्याला आम्ही
गेले प्राण किती जरी
सारा भारत वाचवण्याला
तिरंगा आमुचा नीत फडकवण्या
आम्ही सारे एकजुटीने
सज्ज राहू या देशासाठी !!

