प्रेत
प्रेत
अबोल झाले बोल
मिटले सारे सूर
अचेत तना मनात
ना उरला कसलाच नूर ..
होत आहे कलेवर
केवळ अश्रूंचा पूर
आठवणींचा हा बोजवारा
आला दाटून स्वकियांचा ऊर..
दिगंतातले नाव ही मिटले
जीवन कसे हे क्षणभंगूर
प्रेत म्हणून संबोध होती
ही आयुष्याची तर थट्टा क्रूर
