आठवण
आठवण
काय राव वर्णावी जुन्या खेळाची पर्वणी,
स्मृतीत गेल्या सर्व न् राहिल्या त्या आठवणी.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायचो,
लपाछपी,डावडुबली सवंगडी मिळून खेळायचो.
आंबे चोरण्याची तर हौस न्यारी असायची,
पकडल्या गेलो की कानपटीत बसायची.
काडब्याच्या पेरखुंडाची बैलबंडी बनवायचो,
अनवाणी पायाने पांदी पालथ्या घालायचो.
टायर आणि रिंग चालवायची मजाच लई भारी,
गावातल्या पोट्टयायची खूपच होती यारी.
विटीदांडू, सूरकाठी,गधे लवनी नि टांगाफोडी,
वेळेनुसार खेळांची नीट बसवायचो आम्ही घडी.
मामाचे पत्र तर हारपूनच गेलं...,
लंगडी, बित्ती नि भोवऱ्याने तर पारणे फेडल.
आत्ताच्या पोट्ट्यायले तर एकच वेड,
क्रिकेट नि मोबाईल शिवाय दुसरे नाही खेळ.
