अस्तित्व
अस्तित्व
झुळूक येता वाऱ्याची
ज्योत दिव्याची फडफडती
अस्तित्वासाठी झगडती
नि पुन्हा जोमाने तेवती !
वादळ घोंगावती समुद्रां
नाव पाण्यात भरकटती
आधार दीपस्तंभाचा घेती
नि पुन्हा किनारी लागती !
सरी बरसती पावसाच्या
न्हावूनी धरणी होती गर्भार
ग्रीष्मात सुकल्या सृष्टीला
पुन्हा फुलवी हिरवेगार !
