STORYMIRROR

Deorao Chide

Tragedy Classics

3  

Deorao Chide

Tragedy Classics

कोरोनाचा कहर

कोरोनाचा कहर

1 min
203

काय सांगू भाऊ आता कोरोनाचा कहर,

चालणे फिरणे बंद झाले, घरीच काढा प्रहर ll


येता शिंक वा खोकला लोक दुर पळू लागले,

शेक हॅण्ड नि आलिंगन तर विसरुनच गेले ll


मास्क हा चेहऱ्याचा तर आभूषण झाला,

सुरक्षित राहण्यासाठी पर्याय नाही याला ll


मी पुन्हा येईन.. म्हणत पुन्हा तो आला,

पहिल्यापेक्षा हा तर रौद्र रूप घेवून आला ll


उपचारा अभावी रुग्णांचे हाल होवू लागले,

दवाखाने, बेड्स, ऑक्सीजन कमी पडू लागले ll


म्हणून सांगतो भाऊ तुम्ही घरातच रहा,

कोरोनाच्या महामारीपासून दूर तुम्ही रहा ll


लग्न, सण समारंभ मोजक्याच लोकांत करा,

सरकारच्या नियमांचे पालन तुम्हीं करा ll


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy