अभागी नार
अभागी नार
मी नार ग अभागी
कुणा सांगु माझे दुःख
स्वप्न अंतरी मातृत्वाचे
नाही मिळाले मला सुख
पुर्ण नारी चे ग रूप
जिचा फुलतो संसार
का ? भाग्य ना लाभले
मी का ग ? अभागी नार
कैक झाले ग दिस
माझ्या जीवन संसाराला
पण, अजून ना फुटला
देठ माझ्या संसार वेलीला
केले किती व्रत- वैकल्य,
नवस आणि औषधोपचार
लागता चाहूल भरल्या कुसेची
अल्पायुतच का? खुडतो ग अंकुर
