दिवाळी
दिवाळी
1 min
397
आला सण दिवाळीचा
उत्साह नवचैतन्याचा
लक्ष लक्ष दिव्यांचा
अंगणी साज रांगोळीचा !!
आला सण दिवाळीचा
खमंग पंचपक्वनांचा
आतिषबाज फटाक्यांचा
क्षण चहूकडे सुखाचा !!
आला सण दिवाळीचा
मनी गोडवा नात्यांचा
उंच आकाशकंदिलाचा
सप्तरंगी प्रकाशाचा !!
आला सण दिवाळीचा
पहाट सोनेरी आशेचा
दीनदुबळ्यांच्या चेहऱ्यावर
उधळीत रंग आनंदाचा !!
