STORYMIRROR

Deorao Chide

Fantasy

3  

Deorao Chide

Fantasy

फुलपाखरु

फुलपाखरु

1 min
894

फुलपाखरु मी

गोड गोजिरे

रंगबिरंगी

रूप साजिरे ..

   सान - सनुल्या

   फुला फुलांवरी

   विहंग माझा

   असे स्वच्छंद

   शोषून घेण्या

   गोड मकरंद ..


जीवन असले

जरी क्षणभंगुर

आनंदाने जगू

पुरेपूर...

   मुले बागळतील

   आनंदाने

   धावून येती

   मला पकडती

   चकवूनी त्यांना

   मी उडून जाती..


नाजूक असले 

तन माझे जरी

रंगबिरंगी

पंख रुपेरी..

   डौलदार असे

   माझा संचार

   कधी फुलावर

   कधी पानावर

   विसावा घेतो

   मी थकल्यावर..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy