हरवलेली नाती
हरवलेली नाती
जाते दिसा गनिक दिस
तसे बदलती समाज, माणूस
स्वार्थासाठी हरवली इथे
नाती- गोती आजमितीस
सख्खे भाऊ ही आता
झाले एकमेकांचे वैरी
शेती, संपत्ती वाट्यासाठी
उठले एकमेकांच्या जीवावरी
ना उरली आज इथे
भावाबहिणीची ही माया
मान सन्मानापोटी भांडती
संगे भावजय - भाऊराया
वृद्ध मायबापही आता
होती डोईजड मुलास
ना बाळगता खंत त्यांची
रवानगी करतो वृद्धाश्रमात
बंद झाले मनाचे द्वार
दुरावा नात्यात दिवसेंदिवस
बुरखा घालून वावरती
माणसे हरवली नात्यास
