बरोबरी
बरोबरी
1 min
365
जन्मतःच इथे शिकविली जातात
गरीब श्रीमंतीची भाषा
पायरी ओळखून वागावं
हीच सर्वांची अभिलाषा..!
वस्तीही वसली जाते
इथे समान जाती धर्मियांची
सोयरिकही होतात इथे
बरोबरीच्या लोकांची ..!
नातेवाईक ही भाव देतात
बरोबरीच्या नातलगांना
समारंभ नी शुभकार्याला
घेवून मिरवतात तयांना..!