मन माझे
मन माझे
मन माझे..
सैर भैर झाले
ऊन सावलीत न्हाले
वाऱ्यासोबत खेळले
तुझ्या प्रीतीत गुंतले
मन माझे
पुलकित झाले
स्वप्नात पुरते रंगले
झोपाळ्यावर सवे झुलले
देहभान हरपून बसले
मन माझे
खट्याळ झाले
तुझ्यावर भाळले
प्रेमात चिंब भिजले
तुझ्या आठवणीत रमले
मन माझे
पतंग झाले
वाऱ्यासंगे नभात उडले
धाग्याच्या तालावर नाचले
तुला शोधण्यात गुंतले
मन माझे
कविता झाले
भावविश्वात रमले
लेखणीतून फुलले
काव्यगंधात उतरले
