STORYMIRROR

Manisha Potdar

Fantasy

4  

Manisha Potdar

Fantasy

निसर्ग नगरी

निसर्ग नगरी

1 min
424

गगन महानगरी तेथे राही मेघ नवरी

पवन नवरा धाव घेई गगनी महानगरी

सदा नांदती ग्रहमंडळ ब्रम्हांडी

चमकती नटती, वाजंत्री कडकडाट गगनी


धावत आली सरसर नाचत वर्षारानी

पर्वत, शीखर पार करत आली वर्षारानी

घेऊन जलाम्रुत तयार झाली अवघी जीवसृष्टी

उदंड झाहली हीरवळ, नटली ही मायानगरी


सुर्याची मिळता ऊब, हसली धरती रानी

चैतन्य संचारले वणस्पती, जीव, धरती

दिसतात सुर्य, चंद्र, तारे धरती वरुनी

शोध घेई मानव अंतराळ गगनी


निर्मिती केली निसर्गाने अनेक जीवांंची

लाभला जन्म मानवाचा धन्य झालो आंंम्ही

ज्ञान ईथे , बुद्धी ईथे, विज्ञान ईथे, शोध ईथे

विविध कला नांदती ह्या धरतीवरी


निराकार निर्विकार देव, देवी लाभला हरी

साधुसंत, ऋषी लाभले ह्या धरतीवरी

जन्म, मरन लाभले आयु्र्वेद धरतीवरी

शास्र,वेद ज्ञानाचं भांडार धरतीवरी


निसर्ग आपला गुरु, निसर्ग आपुली माऊली

बाप आपला निसर्ग, आई आपली निसर्ग

व्हावी सेवा सृष्टीची, निर्मीली मानव नगरी

गगन महानगरी तेथे राही मेघ नवरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy