माझी डायरी
माझी डायरी


छान माझी डायरी.......
सोबती आहे माझ्या क्षणोक्षणी
तिला सांगते मी मनातले सर्व
सावली सारखी असते मागे
तिच्यावर आहे मजला गर्व
छान माझी डायरी.......
आहे छोटीशी दिसायला छान
तिच्यात सर्व जग समावे अशी
सुखदुःख वाटून घेते ती माझे
रोज न विसरता मी लिहिते जशी
छान माझी डायरी.......
नाव छान आहे तिचे डायरी
जीवनात मोल तिचे माझ्या खूप
जुळले ते नाते पेनाचे तिच्याशी
रंग तिचा पांढराशुभ्र दिसे रुप
छान माझी डायरी......
लिहिते मी हसतमुखाने हृदयातले
भाग आहे ती माझ्या मनाचा
करमत नाही ऐक क्षण तिच्याविना
नेहमी सोबत ठेवते मी डायरी