त्याग मूर्ती रमाई
त्याग मूर्ती रमाई


आयुष्याच्या वाटेत साथ रमाईची भिमाला होती
स्वतःच्या इच्छेला मारून घडवत भिमाला होती
गोवऱ्या थापून पैसे गोळा करीत संसारासाठी
त्यागाची ती मूर्ती रमाई मिळाली भिमाला होती
पती परदेसी असता पत्र भिमाला पाठवे रमाई
सुखाची अपेक्षा न करता सांभाळे भिमाला होती
त्यागाचे मोठे उदाहरण ठेवून माझी रमाई गेली
अंत श्वास असेपर्यंत झटली रमाई भिमाला होती
लपून अश्रू डोळ्यांतले हसूच ठेवले चेहऱ्यावर
भाग्यवान होता पत्नी रमाई लाभली भिमाला होती