वेगळे रंग
वेगळे रंग

1 min

210
गाणी मीही गाते प्रेमाची आता रे
संगीताची गोडी झाली ही आता रे
वाजे गुंजे साऱ्या विश्वाला सांगे मी
दोस्ती केली स्वरांशीही मी आता रे
वादयांच्या ताली नाचू लागे मी आता
नाती मी जोडीली नृत्याशी आता रे
रंगांची गोडी मोठी वाटे या जीवा
दारे सारी मी खूली केली आता रे
स्वप्ने जागी माझी झाली या क्षणांनी
शांती जीवाला आली माझ्या आता रे