सिद्धार्थ गौतम बुद्ध
सिद्धार्थ गौतम बुद्ध


माहेरी जाण्या महामाया निघाली
ती वैशाख पौर्णिमा आज आली
लुंबिनी वनात ती विश्राम करण्या
प्रसव वेदनेला सुरुवात त्या झाली
चंद्रप्रकाशात त्या झाडाच्या छायेत
जन्म बुद्धांचा लूंबिनी वनात झाला
धरती निसर्ग आकाश खुशीत आले
कपिलवस्तू नगर आनंदमयी झाला
कपिलवस्तु उत्तराधिकारी मिळाला
सिद्धार्थ गौतम छान नाव ठेविले
साथ सुटता मातेचा सिद्धार्थापासून
प्रजापति गौतमीने संभाळ केले
विवाह यशोधेशी सिद्धार्थाचा झाला
दोघांना पुत्ररत्न राहुल बाळ झाला
संसार सोडूनी गृहत्याग त्याने केला
राजाचे जीवन सोडून संन्याशी झाला
अशित मुनीची ती भविष्यवाणी
अखेर खरी होण्या आली होती
सिद्धार्थ गौतमाची चिंता आता
शुद्धोधन गौतमीला पडली होती
उपाशी ध्यान साधना फार केली
कित्तेक वर्ष ज्ञान शोधण्यात गेले
बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली
सर्व जगाला बुद्ध अवगत झाले
शांतीच्या मार्गाने चालावे उपदेश केला
अष्टांगिक मार्ग बुद्धाने जगाला दिले
झाड पिंपळाचे बोधिवृक्ष बघा झाले
पौर्णिमेस बुद्धांचा महापरीनिर्वाण झाले