रूपवती
रूपवती


ती सुगंधी बाग आहे मोहणारी सुंदरी
घाव ते पाठीत केले बोलणारी सुंदरी
ओठ आहे लाल रंगाचे गुलाबी छानसे
वेड प्रेमाचे मलाही लावणारी सुंदरी
गोल डोळे काजळाचे चेहऱ्याची सादगी
घात माझ्या काळजाती भावणारी सुंदरी
चालते ती मोरणी वाटे जशी राणी हसे
साथ माझा तोडला हा लाजणारी सुंदरी
ती मनाला ओढणारी स्वप्न देणारी परी
जीवनाला उध्वस्त ही सोडणारी सुंदरी