आकाश
आकाश
1 min
14.7K
आकाशही माझे अर्णव माधुर्याचा,
ती प्रशांत मूर्ती वेदब्रह्मची साचा.
ते शब्दांमृतही हृदयी कोरुनी घ्यावे,
मधु लेण्याद्रीला नयनी ओवाळावे.
ते चंद्रसूर्यही नेत्रच ज्ञानीयाचे,
ओठात शर्वरी नवग्रह अवयव त्यांचे.
ती ज्ञानरश्मिही अज्ञांवरी वर्षावे,
त्या बृहस्पतीला नयनी ओवाळावे.
त्या नभात भरले जलदही सिद्धांतांचे,
वर्षावत मौक्तिक शिष्यांवरती साचे.
त्या नभार्णवाच्या अंकावरी लोळावे,
अन् धवलकीर्तीला नयनी ओवाळावे.
मनकवडे वत्सल सरितेहुनी सच्छील,
मृदु रेशिमभावे सांभाळीले सकल.
पावित्र्य मनाचे झेलुनी त्याच्या घ्यावे,
त्या ओंकाराला नयनी ओवाळावे.