STORYMIRROR

Deepali Mathane

Romance Fantasy

3  

Deepali Mathane

Romance Fantasy

कधी तू

कधी तू

1 min
304

कधी तू आपुलकीचा भाव

सुखस्वप्नातला माझा गाव

   कधी तू खळखळता झरा

   आनंदाने ओसंडून वहा जरा

कधी तू भासे थंडगार वारा

श्रावणसरींच्या सुखद जल धारा

   कधी तू मोहक सुगंध मोगऱ्याचा

  रातराणीच्या प्रेमात भुललेल्या ताऱ्यांचा

कधी तू मऊ अशी दाट हिरवळ

प्रेमाच्या झुळूकेचा मोहक दरवळ

   कधी तू मंजूळ नाद बासरीचा

   राधिकेच्या मनातील मूर्तरूप हरिचा

कधी तू एक क्षण माझ्या विसाव्याचा

जगण्यातील अनमोल अशा श्वासाचा

   कधी तू थांग अथांग सागराचा

   मनात साठलेल्या असंख्य जागराचा

कधी तू कारण माझ्या मनमुराद हास्याचा

तर कधी पापणीत विरघळलेल्या अश्रूंचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance