STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy

3  

Sarika Jinturkar

Fantasy

रात्र

रात्र

1 min
352

हवीहवीशी वाटते कधीतरी 

रात्रीची ही नीरव शांतता

स्तब्ध झालेले जग शांत झोपलेली वसुंधरा


 घरट्याकडे परतलेले पक्षी अन्

 पांघरलेल्या शाली वरती चांदण्याची नाजूक नक्षी  


साऱ्या जगाला थांबून घरी परतलेला हा दिनकर

 रात्रीचे सौंदर्य खुलविण्यासाठी आकाशात 

अवतरलेला हा शशीकर


 निळे निळे आकाश मंद वाहणारा हा वारा  

तळपत्या प्रभाकरास अलगद निजवून 

चंद्रिकांच्या समुहात नटलेला हा आसमंत सारा  


गर्द काळोखी शोभून दिसतो हा लुकलुकणारा तारा

अंगावर शहारे आणतो सुटलेला हा थंडगार वारा 


उत्तरली निशा ही घेऊन गंध कोवळा 

हर्ष होई मनी बघूनी

अंगणी सजलेला हा काजव्यांचा सोहळा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy