उधळण झाली नभावर
उधळण झाली नभावर
उधळण झाली नभावर
सोनेरी या रवीकिरणांची
न्हाऊन निघाला चराचर
ग्वाही देतो चैतन्याची
गंधाळलेल्या रात्रीस
ओढ प्रकाशित होण्याची
मावळल्या सर्व निराशा
उधळण होता किरणांची
क्षितिजाच्या भाळी टिळा
शोभे सोन- पितांबरी रंगाची
उधळण झाली नभावर
चढली लाली भूवरी तेजाची
किलबिल करती पक्षी
सुस्वरात कोकिळा गाती
दवबिंदूचा स्पर्श होता
पान-फुले ही बहरती
झुंजूमुंजू होऊनी वारा
गुंज सांगून कानी काही
डोंगरदरी फिरून
सरिता ही संथ वाही
