पुन्हा एक वर्ष
पुन्हा एक वर्ष
पुन्हा एक वर्ष
असं गेलं सरून
आठवणींची झोळी
आणखी थोडी भरून
दुःखाची जळमट
अलवार साफ करून
स्वप्न अंतरीचे
काही साकारून
अनुभवाचे विश्व
आणखी समृद्ध करून
काही सुंदर क्षण
अलगद मंतरून
नात्याची नाजूक वेल
आणखी विस्तारून
एक नवा संकल्प
पुन्हा मनात पेरून
आयुष्याच्या पानावर
एक नवी उमेद जागवून..
