भव्य शिखर यशाचे
भव्य शिखर यशाचे
भव्य शिखर यशाचे
ध्येय अंतरी उद्याचे
सिद्ध करूनी दाखव
युग कठीण स्पर्धेचे
जागोजागी अडथळे
वाट भयाण काटेरी
फल प्राप्ती संघर्षाला
रंग स्वप्नांचे सोनेरी
ठाम निर्धार ठेवूनी
सोड भिती हारण्याची
उद्या जाईल सरूनी
गर्द रात्र काळोखाची
येती असंख्य वादळे
जीवनाच्या पथावरी
ओसरूनी जाती क्षण
कोण थांबतो भूवरी
भव्य शिखर यशाचे
ध्येय अंतरी उद्याचे
प्रयत्नांची परकाष्ठा
दिव्य किरण आशेचे
