STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational Others

4  

Sarika Jinturkar

Inspirational Others

नेत्रदान

नेत्रदान

1 min
293

नेत्रदान करूनीया 

मृत्यू पश्चात जगावे

दान सत्पात्री चांगले 

जाणीवेने ते करावे 


मना पुण्याने आनंद 

पाहे नेत्रहीन सृष्टी 

ठेवा नेत्राचा अमुल्य  

जीवा स्वर्गसुख वृष्टी 


वाटेवर या अंधाऱ्या

प्रकाशाच्या रे दीपाने

दिसे अद्भुत नजारा 

नेत्रदान संकल्पाने


मानवता हाच धर्म 

देऊ सर्वांना आदर 

प्रेम अर्पूया जगाला 

भरू सत्कर्म घागर 


घेऊ संकल्प आगळे 

जगा देऊ दिव्यदृष्टी 

नवसृष्टी घडवण्या  

करू सुविचार वृष्टी 


करू संकल्प हा नवा 

मनी रूजवू संस्कार 

नेत्रदान सर्वश्रेष्ठ 

देऊ जीवना आकार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational