STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

4  

Sarika Jinturkar

Abstract

हरवलेला काळ

हरवलेला काळ

1 min
13


 गेले हरवून सारे
पक्षी कुठे सुखाचे
मनाच्या नभांगणाला
नाही पंख आनंदाचे
 होती जुन्या काळी
जिव्हाळ्याची नाती
मात्र आता कोमेजल्या
नात्यातल्या भावपाती
 अहंकार आज वाढला
घात केला तंत्रज्ञानाने
एकेकाळी राहत होते
सारे कुटुंब सन्मानाने
 दोन शब्द आपुलकीचे
आता झालेत कमी
जुन्या काळासारखी
नाती नाहीत संयमी
 पुन्हा नाही येणार
हरवलेला काळ
पापणीच्या काठावर
आयुष्याची सांयकाळ 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract