जरी मांडलास खेळ
जरी मांडलास खेळ
जरी मांडलास खेळ
बघ आयुष्या मजला
नाही हरले अजून
ध्येय आहे सोबतीला
नको समजू शेवट
जरी उठले वादळे
पुन्हा येईल प्रकाश
सूर्य कुठे हा झाकळे
कोण पाहे भाग्यरेषा
ज्याच्या अंतरी निराशा
योद्धा लढे त्वेषातूनी
मिळे त्यासी नवी दिशा
दृढ विश्वास ठेवून
बघ निघाले पुढती
स्वार्थ भरल्या विश्वात
कोण कुणाचा सोबती
जरी मांडलास खेळ
बघ आयुष्या मजला
किती छाटशील पंख
जिद्द आहे सोबतीला
