डाव
डाव
कोणता दिवस असेल
किंवा असेल तो क्षण
अखेरचा ठरणार डाव
थांबेल तिथेच जीवन..
खूप काही ठरवलेले
राहील तसेच्या तसे
अर्ध्यावर मोडेल डाव
वाटले कधी कुठे असे..
नसतं आपल्या हातात
कितीही ठरवलं जरी
सारं बिघडतं गणित
सूत्रं मांडली योग्य तरी..
स्वत:वरचा विश्वास सुद्धा
तेव्हा पडतो कमी
सर्व काही माझ्या हातात
होती याची दृढ हमी..
शहाणं व्हावं आता तरी
समजून घ्यावी ही खेळी
जाण्याआधी जगा असं
यावं वाटे पुढच्या वेळी..
