राखी बहिण भाऊ
राखी बहिण भाऊ
काय करणार आता
आणू कुठून सख्खा भाऊ
म्हणून रूसून बसली होती
कितेक दिवस स्वतःवरच!
नाही कोणी सख्खे बहिण भाऊ
ना कोणी सख्खे आई बाबा
पण आहे सर्व अवती भोवती
राखीचे प्रेमबंध जपणारे!
समज राखी प्रेमबंधनाची
येण्या गेला खूप वेळ
एकदा समजताच
नाही रूसले मी आता स्वतःवर!
राखी बहिण भाऊ
ह्या नात्याचा ठेऊन मान
राहते मी आनंदी समाधानी छान
नसते आता कसली नात्याची चिंता!
