दिसते तसे नसते
दिसते तसे नसते


धष्टपुष्ट दिसणाऱ्या शरीराच्या
मिस्टर युनिव्हर्सला झाली दुखापत
ज्यामुळे घराबाहेरच पडावे लागले थेट
चर्चेला आले उधाण
खरेच बाकी सोजवळ
चढले वरचढ मिस्टर युनिव्हर्स च्या पुढे?
टीआरपी वाढवण्याच्या नादात
उल्लू बनवले जाते
सामान्य जनतेला?
दिसते तसे नसते
सेट असतो हा खेळ सारा
पडतो घराबाहेर एक एक
पटकथा लिहिणार्याच्या तालावर...
आपण पाहतो रियालिटी शो म्हणून
पण असते शो ची दोरी
आपल्या भाव भावनांशी खेळून