STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आधार स्पर्शाचा

आधार स्पर्शाचा

1 min
192

हात हातामधी येता

मनी सुख दाटतसे

बोल मनातील माझे

हात माझा बोलतसे   (१)


कधीकधी शब्दांपेक्षा

स्पर्श असतो बोलका

स्पर्शानेच कळे तुला

मम मनीच्या भावना   (२)


फोन ईमेल मेसेज

सारे व्यर्थचि भासते

स्पर्श देतसे मायेची

ऊब मजला भावते    (३)


भेट तुझी माझी आज

शब्दांविना फुलविली

लाखो शब्द अपुरेच

स्पर्शबोली बहरली    (४)


दुजे काही नको मज

हवा आधार मनाला

हात हातात घेऊनी

नित्य दे राजा मजला    (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract