STORYMIRROR

Samadhan Navale

Abstract

3  

Samadhan Navale

Abstract

शब्द

शब्द

1 min
184

खरंच.. का? मनातील संगीत, छेडीत सप्ततारा,

उचंबळून येते,नी बनते विचारधारा,

अनुभवाचे नवनीत, घुसळून जीवनात

विद्युल्लतेप्रमाणे..प्रकटते मनात,

या वृथा,संथ विचारलहरी,मनाच्या प्रांगणात

येतात कल्पनेतून, कधीतरी,

तेव्हाच त्यांना मिळतो, आधार शब्दांतरी

भविष्य गुह्य कोठे,तर कोठे कल्लोळ संबंधांचा

जीवनच आहे रथ हा,उद्यमी विचारांचा,

विचाराने मिळतो,हा आदर्श जीवनाचा

बुद्धीची जोड असता,मिळे शिखर आदर्शाचा,

भावनाशील मन हे..गुंफते शब्दांना

शब्द हीच घडवतील, मानवी भावनांना,

भाव जेथे घुसला, बुद्धीच थिटी झाली

अजाणता ही किमया विचारांनी केली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract