STORYMIRROR

Samadhan Navale

Inspirational

3  

Samadhan Navale

Inspirational

प्रतीक

प्रतीक

1 min
293

काटेरी बाभळीला फुले आलीत पिवळी,

पावसाचे नभ आले,आले माझ्या जवळी |

प्रत्येक ढगासंगे येतो थोडा पाऊस

"होतोस का कासावीस"? म्हणे नभ धरास..

प्रचंड विद्युल्लतेने दीली कुणा आरोळी..?

पावसाचे नभ आले,आले माझ्या जवळी ||

रानात गुरे चारतांना, आली मनी कल्पना

का येऊ नये बोलता ? या मुक्या झाडांना,

ऊन,पावसाचा सोशीत मारा,त्रास का होत नाही?

होतो जर त्रास.. मग झाडं का बोलत नाही?

ईश्वराची किमया सारी,वाटे मला आगळी

पावसाचे नभ आले,आले माझ्या जवळी ||

कल्पना विश्वात मी, विचारले या झाडांना

त्रास होत नाही का रे.. उभे राहुन तुमच्या हाडांना?

पावसाचा मारा सोसून,ऊन्हाचा कडाका सोसून

तुम्हा कसे रडु कोसळत नाही?

सर्व सांगा मला, तुमची मने होतील मोकळी

पावसाचे नभ आले, आले माझ्या जवळी ||

कल्पना विश्वातले हे झाड, काय बोले मला

"प्रश्न हाच विचार तु..माझ्या या पिवळ्या फुला"

फुल म्हणू लागले "मी काट्यात असूनी,

बघ कसा राहीलो तोऱ्यात बसुनी"

'जीवन सुखदुःखाची माया आहे निराळी'

पावसाचे ढग आले,आले माझ्या जवळी ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational