Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samadhan Navale

Romance

3  

Samadhan Navale

Romance

रंग प्रीतीचा

रंग प्रीतीचा

1 min
210


नायक - तुझ्या माझ्या प्रीतीचा रंग सखे न्यारा

पहिल्या वहिल्या प्रेमाचा खेळ हा सारा,

गोऱ्या गोऱ्या अंगावर शोभतोय रंग

पाहता प्रथम तुज झालो मी दंग,

नायिका- जा रे जा,वेड्या तू करू नको तंग

भिजले रंगात माझे गोरे गोरे अंग,

मनमोर पाहुन अंग फुलवी पिसारा

पहिल्या वहिल्या प्रेमाचा खेळ हा सारा ||

नायक- लाजू नको राणी,नको होऊ बावरी

नायिका-नजर तुझी रे खूप वाटे हावरी,

नायक- काय आहे त्यात? सखे प्रेम तुझे गं,

तुझ्या गोऱ्या अंगावर रंग जसा गं 

नको दूर जाऊ जीव कासावीस गं !

साहवेना मला कसा,हा तुझा तोरा

पहिल्या वहिल्या प्रेमाचा खेळ हा सारा ||

नायक- कसा जडला हा प्रेमरोग असा?

सुचेना काही मला,जीव वेडापिसा,

प्रेम काय असते हे आज कळाले

तुजविण राहु कसा? पाण्याविना मासा,

नायिका- बापाला मागणी माझ्या,घाल रे पोरा..

पहिल्या वहिल्या प्रेमाचा खेळ हा सारा 

तुझ्या माझ्या प्रीतीचा रंग सखे न्यारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance