STORYMIRROR

Samadhan Navale

Fantasy Inspirational

3  

Samadhan Navale

Fantasy Inspirational

तत्त्वज्ञान जीवनाचे

तत्त्वज्ञान जीवनाचे

1 min
183

मानवी मनाच्या कप्पीतून निघतात कीतीतरी कल्पना,

करण्यासाठी साकार त्यांना, होतात भारी यातना

असतात मनात दडलेली,नवीनवी स्वप्नं

जीवन व्यतीत करतांना...त्याच स्वप्नांच्या पूर्तीवर

लक्ष सदा ठेवताना,

सरते कधी आयुष्य, कळतं नाही स्वत:ला

येऊन ठेपते मग वेळ,विचारायची स्वत:ला

स्वप्नपूर्तिसाठीच का मी,व्यर्थ घालवीले जीवाला,

जीवनात कीती माझ्या,झालीत स्वप्न पूर्ण

वेचले कीती आयुष्य,राहीले कीती अपूर्ण,

विचार याचा केला मनी,तर असेच येईल ध्यानी

झाली फसगत जीवनाची, व्यर्थ जींदगानी,

नसतेच वाईट बघणे स्वप्न, नसतात वाईट आशा-आकांक्षा

पण खूप वाईट असते,राहणे अवलंबून स्वप्नावर,

स्वप्न हे स्वप्नच असते,विसरु नये सर्वांनी

बघत बसण्यापेक्षा स्वप्न, करतं जावे कर्म

करावे सार्थक जीवन, करून काही सेवाधर्म,

स्वप्न आणि कर्म,अंतर आहे थोडे

एक आहे जंजाळ, एक आहे कोडे,

जरी हे सत्य असले,की करते प्रेरित कर्माला

तरीही विसरू नये कुणी, आपल्या अवघ्या मानवधर्माला,

करावेत प्रयत्न पुर्तीसाठी, मर्यादेच्या चौकटीतून

प्रयत्न करावा निघण्याचा,स्वप्नरुपी व्युहातून,

स्वप्न आणि मन, यांच्या जणू युद्धात

भरडले जावे जीवन...

वाटत नाही मला तरी,हेच आहे जीवन

जीवन म्हणजे वास्तव आहे, जीवन कर्मशाळा

जीवन मुक्त पवन आहे, उगीच फसतो मानव भोळा !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy